Ad will apear here
Next
रेने गॉसिनी
...आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
१४ ऑगस्ट १९२६ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेला रेने गॉसिनी हा आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक. १९५५पासून त्याने प्रसिद्ध कॉमिक लकी ल्युकसाठी लिहायला सुरुवात केली. त्याने ‘टिनटिन’ मासिकासाठीही लेखन केलं होतं; पण लवकरच त्याला अल्बर्ट उदेर्झो भेटला आणि दोघांनी मिळून धमाल पात्रांच्या धमाल विनोदी कॉमिक स्ट्रिप्स बनवायला सुरुवात केली. १९५९ साली गॉसिनीने फ्रेंच भाषेत ‘पायलट’ हे विनोदी मासिक सुरू केलं आणि उदेर्झोच्या साह्याने ‘अॅस्टेरिक्स दी गॉल’चा जन्म झाला. फ्रान्सचं पूर्वीचं नाव गॉल. रोमन साम्राज्याचे गॉलवर होणारे हल्ले एका गावात राहणारे अॅस्टेरिक्स, त्याचा परम मित्र ओबेलिक्स आणि त्यांचे गावातले सर्व सहकारी मिळून कसे परतवून लावतात त्याच्या हास्यस्फोटक धम्माल रंगीबेरंगी कथा पाहता पाहता जगभरच्या आबालवृद्ध वाचकांना खुळावून गेल्या. अॅस्टेरिक्स कॉमिक्सने सर्वांचंच आयुष्य मजेचं बनवलं. बिल ब्लांचार्त, मॉडेस्टे एत पॉम्पॉन, सिन्यॉर स्पघेटी, ओम्पापा दी रेड स्किन अशी त्याची इतर कॅरॅक्टर्स लोकप्रिय आहेत. पाच नोव्हेंबर १९७७ रोजी त्याचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला. 

यांचाही आज जन्मदिन :
लोकप्रिय कादंबरीकार आणि नाटककार जयवंत दळवी (जन्म : १४ ऑगस्ट १९२५, मृत्यू : १६ सप्टेंबर १९९४) 
जिच्या पुस्तकांच्या ८० कोटींहून अधिक प्रती अनुवादित होऊन खपल्या आहेत, अशी बेस्टसेलर इंग्लिश लेखिका डॅनयल स्टील (जन्म : १४ ऑगस्ट १९४७) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

प्रसिद्ध विनोदी अभिनेता स्टीव्ह मार्टिन (जन्म : १४ ऑगस्ट १९४५)
गायिका सुनिधी चौहान (जन्म : १४ ऑगस्ट १९८३) 
क्रिकेटपटू प्रवीण आमरे (जन्म : १४ ऑगस्ट १९६८) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZRUBR
Similar Posts
व. पु. काळे, कुमुदिनी रांगणेकर, म. पां. भावे, सत्त्वशीला सामंत ‘एकच क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे’,‘आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक’सारखिया असंख्य चमकदार अर्थपूर्ण वाक्यांनी ज्यांच्या कथाकादंबऱ्या सजलेल्या असतात असे लोकप्रिय लेखक व. पु. काळे, अनुवादक कादंबरीकार कुमुदिनी रांगणेकर, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा हे गोड गीत लिहिणारे कवी म
चार्ल्स डिकिन्स ऑलिव्हर ट्विस्ट, निकलस निकल्बी, दी पिकविक पेपर्स, डेव्हिड कॉपरफिल्ड, ए टेल ऑफ टू सिटीज, ग्रेट एक्स्पेक्टेशन्स, ए क्रिसमस कॅरोल, दी ओल्ड क्युरिऑसिटी शॉप अशा एकाहून एक अविस्मरणीय अजरामर कादंबऱ्या लिहिणाऱ्या चार्ल्स डिकिन्सचा सात फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा परिचय...
केदार शिंदे पहिल्या प्रयोगापासून ‘हाउसफुल’चा बोर्ड घेणाऱ्या आणि ३६५ दिवसांत ५६७ प्रयोगांचा उच्चांक गाठणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा तरुण लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे याचा १६ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....
कवी प्रदीप प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच आणि डोळ्यांत आसवं उभं करणारं ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे अजरामर गीत लिहिणारे रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा सहा फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language